आपला जिल्हाविशेष वृतान्त

गडचिरोलीतील धान खरेदीच्या घोटाळ्यात राज्यातील एका मंत्र्यासोबत साडेतीन कोटींची डील?; जिल्ह्यात चर्चेला उधाण

गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या आदरातिथ्यात घेतली दक्षिणा !

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२५ सप्टेंबर 

गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या भात उत्पादक भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या धान खरेदीच्या घोटाळ्याचा चौकशीनंतरही ब्लॅक पँथर लिस्टेड राइस मिल्स ला मागील हंगामात भरडाईसाठी धान दिले गेले. या प्रकरणात प्रादेशिक आदिवासी सहकारी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक केंद्राचे व्यवस्थापक गजानन कोटलावार यांना निलंबित केले गेले. या मोठ्या घोटाळ्यात मात्र मिलर्सवर कोणतीही कारवाई झाली नाही. सदर घोटाळ्याची धग अजूनही कायम आहे. त्यामुळे धास्तावलेल्या मिलर्सनी एकत्र येऊन ही चौकशी होऊच नये किंवा आपल्यावर त्यावरून कारवाई होऊ नये यासाठी एका कॅबिनेट मंत्र्यासोबत साडेतीन कोटी रुपयांची डील केली असल्याच्या जोरदार चर्चेला गडचिरोली-गोंदिया जिल्ह्यात उधाण आले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील खाण क्षेत्रात कार्यरत एका दलाला मार्फत ही डील करण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या आदरातिथ्यात सदर दक्षिणा घेतली असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी असेल याचाही अंदाज लावला जात आहे. यासोबतच हा घोटाळा मंत्रालयीन स्तरावरुन दाबला जाणार की चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होणार. याकडे लक्ष लागले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!