खदान विरोधी ठिय्या आंदोलनस्थळी शहिदांचे केले स्मरण
शहीद ए आझम भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना जनतेचे अभिवादन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली,दि. २७ मार्च
दमकोंडवाही सह सुरजागड व्हॅली मधील लिलावात निघालेल्या ६ खदानी रद्द करण्याची मागणी घेऊन एटापल्ली तालुक्यातील महाराष्ट्र, छत्तीसगड सीमेवर तोडगट्टा येथे ११ मार्च पासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलन स्थळावर २५ मार्च रोजी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त त्यांचे स्मरण करण्यात आले. याप्रसंगी सुरजागड, भामरागड पट्टी, वेनहारा इलाका, रुपबारसा, छग चे कोटा, मेटापरगल, बेचाघाट बचाओ आंदोलन समिती, आदिवासी युवा छात्र संघटन कांकेर ब्लॉक, आदिवासी युवा विद्यार्थी संघटनांसह छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील १० हजारांच्या आसपास जनतेची उपस्थिती होती.
देशभरातील विविध भागात विविध मंचावरून जल जंगल जमीनीची लढाई आदिवासी बहुल क्षेत्रात लढली जात आहे. ही लढाई भांडवलदारांकडून होणाऱ्या लूटीच्या विरोधात, आदिवासींच्या मुलभूत हक्कांवर गदा आणणाऱ्या सरकार, प्रशासनाच्या विरोधात संवैधानीक मार्गाने सुरू आहे. संविधानाने प्रदान केलेल्या अधिकारांवर घाला घातला जात असून त्या विरोधात हे आंदोलन असल्याचे वक्त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. आपल्या निश्चयावर ( भूमिकेवर) ठाम राहिल्याशिवाय ही लढाई जिंकता येणार नाही नाही. ग्रामसभांची एकी हेच आंदोलनाचे यश असल्याचे प्रतिपादन या वेळी करण्यात आले. भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचेप्रमाणे खदान विरोधी आंदोलनात शहीद होण्याची तयारी ठेवावी लागेल असे आवाहन आपापल्या भाषणात ग्रामसभांच्या कार्यकर्त्यांनी केले.
क्षणचित्रे
कार्यक्रम स्थळी विविध नक्षल्यांच्या गुप्तचरांसह विविध प्रशासनांच्या गुप्तचरांची उपस्थिती
सभा मंडपात जागा कमी पडल्यामुळे जनतेने आजुबाजुच्या झाडांच्या सावलीचा आसरा घेतला होता.
शेकडो नागरिकांनी पायी चालत गाठले आंदोलन स्थळ, सर्वांनी आपापला शिधा एकत्र करून सामुहिक भोजनाची व्यवस्था केली होती.
आदिवासींच्या आंदोलनाला नक्षलवाद्यांचे आंदोलन संबोधले जात आहे. पत्तु पोटावी, मंगेश नरोटी, मंगेश होळी, किशोर वेळजे, दोहे हेडो अडंगे यांचे सह आंदोलनात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या ग्रामसभांच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी कलम ३२३, ५०४, ५०६, ३४ अंतर्गत नोटीस बजावली आहे. वरवर पाहता ही नोटीस जरी शांतता भंगाच्या संदर्भात दिसून येत असली तरी भविष्यात नक्षलवादी ठरविण्याची भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. सभा मंडपात जागा कमी पडल्यामुळे जनतेने आजुबाजुच्या झाडांच्या सावलीचा आसरा घेतला होता. जोपर्यंत श्रमिकांच्या संसाधनांवर शक्तिशाली व्यक्तींचा एकाधिकार असेल, व्यवस्था परिवर्तन होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार या प्रसंगी व्यक्त केला गेला.
या प्रसंगी खदान विरोधी जनआंदोलनाचे नेते तथा सुरजागड इलाक्याचे प्रमुख सैनु गोटा यांचे मार्गदर्शनात माजी पंस सदस्या शिला गोटा, भामरागड पट्टी चे नेते एड. लालसु नागोटी, माकपचे नेते अमोल मारकवार, छाया दोडूर, गणेश दमकोंडवाही रमेश हेडो, मंगेश नरोटे, प्रदीप हेडो खदान विरोधी जन अंदोलन समिती तोडगट्टा- वन्नाहरा इल्लाखा अध्यक्ष, सचिव, सदस्य, कोत्तुराम पोटावी, नितिन पदा, सुधाकर गोटा छत्तीसगड़ येथील बल्लीराम वडडे- गाँड्वाना साहेब बडगाँव गज्जु पदा छोटे बेटिया राजेश नरोटी, आदिवासी युवा छात्र संघटन आणि त्या सोबत सुरजागड व्हॅली मधील लिलावात निघालेल्या ६ खदानी रद्द करण्याची मागणी घेऊन ठिय्या आंदोलन करणाऱ्या ग्रामसभांचे प्रमुख, पुजारी, गायता, पेरमा यांचे सह दहा हजारांच्या आसपास स्थानिक जनतेची उपस्थिती होती. जोपर्यंत श्रमिकांच्या संसाधनांवर शक्तिशाली व्यक्तींचा एकाधिकार असेल, व्यवस्था परिवर्तन होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार या प्रसंगी व्यक्त केला गेला.