गामा च्या संयोजकपदी श्रीमंत सुरपाम व राजेंद्र सहारे यांची निवड
गडचिरोली ऑल मिडीया असोसिएशन (गामा ) च्या वार्षीक सर्वसाधारण बैठकीत निर्णय

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २३ जाने.
डिजीटल मिडीया क्षेत्रात कार्यरत असलेल्या गडचिरोली ऑल मिडीया असोसिएशन (गामा ) ची वार्षीक सर्वसाधारण बैठक गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकातील विश्रामभवनात पार पडली. या बैठकीत गामाच्या नवीन संयोजकाची निवड करण्यात आली. संयोजकपदी राईट टाईम न्यूज पोटर्लचे संपादक राजेंद्र सहारे आणि संतोष भारत न्यूजचे संपादक प्रा. श्रीमंत सुरपाम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रसार माध्यमांमध्ये डिजिटल क्रांती घडून आली असून डिजिटल मिडीया आता प्रसार माध्यमांचा महत्वपुर्ण घटक बनला आहे. त्याअनुषंगाने डिजिटल मिडीया क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकारांचे गडचिरोली ऑल मिडीया असोसिएशन गठीत करण्यात आले आहे. या असोसिएशनने मागील वर्षभरात डिजिटल मिडीया क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करून आपली ओळख निर्माण केली आहे.
बैठकीला गामाचे सदस्य तथा पुर्णसत्य न्यूज पोर्टलचे संपादक हेमंत डोर्लीकर, गडचिरोली वार्ताचे संपादक जयंत निमगडे, विदर्भ न्यूज एक्सप्रेसचे संपादक मनिष कासर्लावार, एव्हीबी न्यूज पोर्टलचे संपादक अनिल बोदलकर, गोंडवाना टाईम्सचे संपादक व्यंकटेश दुडमवार, महाभारत न्यूज चे संपादक उदय धकाते, राईट टाईम न्यूजचे संपादक राजू सहारे, विदर्भ क्रांती न्यूजचे संपादक मुक्तेश्वर म्हशाखेत्री, संतोष भारत न्युज पोर्टलचे संपादक प्रा. श्रीमंत सुरपाम, वृत्तवाणी न्युज पोर्टलचे संपादक प्रविण चन्नावार, खबर जनता तक न्यूज च्या संपादक रुपाली शेरके उपस्थित होते. बैठकीत गामाच्या मागील वर्षभरातील कामगिरी, गामा अधिक व्यापक कशी करता येईल, तसेच नवीन सदस्यांचा सहभागी करून घेणे यावर चर्चा करण्यात आली.
पत्रकार परिषद संदर्भात संपर्क साधण्याचे आवाहन
गडचिरोली ऑल मिडीया असोसिएशनने ( गामा) सर्वच क्षेत्रातील नागरिकांसाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. डिटिल मिडीयाचे महत्व लक्षात घेता ज्यांना पत्रकार परिषद आयोजीत करावयाची आहे, त्यांनी गामाचे संयोजक प्रा. श्रीमंत सुरपाम (9420190877) आणि राजेंद्र सहारे (8830435322) यांच्या भ्रमनध्वनीवर सपंर्क साधावा