आपला जिल्हा
गडचिरोली जिल्ह्यात १४ कोरोनामुक्त तर १२ कोरोनाबाधित
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ३० ऑगस्ट
गडचिरोली जिल्ह्यात मंगळवारी ४४४ कोरोना तपासण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १२ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तर १४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ७६ झाली आहे. जिल्ह्यातील आत्तापर्यंत ३८१५३ कोरोन बाधितांपैकी ३७३०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ७७७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७६ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०.२० टक्के तर मृत्यू दर २.०४ टक्के झाला आहे. नविन बाधितामध्ये गडचिरोली २, चामोर्शी २, धानोरा २, मुलचेरा ३, कोरची १ व कुरखेडा २ जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली १ व मुलचेरा तालुक्यातील १३ जणाचा समावेश आहे.