आपला जिल्हाविशेष वृतान्त

सुरजागड लोह खदानीतून अवैध उत्खनन केल्याप्रकरणी लॉयड्स मेटल्स वर एमपीसीबी ने दाखल केला खटला

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२४ जून 

गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोह खदानीतून अवैध उत्खनन करुन नियम आणि कायदे धाब्यावर बसवून चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्घुस येथील लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी लि. ला दिल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या चंद्रपुर प्रादेशिक कार्यालयाच्या अधिकाऱ्याने अहेरी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात खटला दाखल केला आहे.

लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी लि. कंपनी ने आवश्यक असलेल्या पर्यावरणाशी संबंधित परवानगी मागितलीच नसल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी लॉयड्स व उपाध्यक्ष अतुल खाडिलकर यांना आरोपी केले आहे.
एमपीसीबी ने म्हटले आहे की कंपनी ने राज्याच्या पर्यावरण आणि जलवायु परिवर्तन विभागाच्या प्रधान सचिवांना १९ सप्टेंबर २०२० ला लिहीलेल्या पत्रात लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी लि. कंपनी ने पर्यावरण मंजूरी साठी अर्जच केला नसल्याच्या बाबीचा स्वीकार केला आहे.
उल्लेखनीय आहे की कोणताही प्रकल्प सुरू करताना प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या नियमानुसार ६ महिन्याच्या आत पर्यावरणाशी संबंधित परवानगी घेणे बंधनकारक आहे. एमपीसीबी ने आपल्या याचिकेत म्हटले आहे की अतुल खाडिलकर आणि लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी ली. ने दंडनीय गुन्हा केला आहे.

एमपीसीबी च्या प्रधान सचिवाला लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे की नियमांच्या उल्लंघनासाठी आरोपी अतुल खाडिलकर आणि लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी ली. घुग्घुस यांचे विरुध्द पूढील कारवाई सुरू करण्यासाठी खटला दाखल केला आहे . ऊल्लेखनीय आहे की लॉयड्स मेटल्सने मागील दोन वर्षांपासून सतत सुरजागड खाणीतून लक्षावधी टन कच्च्या लोहदगडाची केवळ घुग्गूस येथेच नव्हे तर महाराष्ट्रात आणि राज्याबाहेर वाहतूक केली आहे.
सुरजागड खाणीतून वाढीव उत्खनन करण्यासाठी लॉयड्स मेटल्सने परवानगी मागितली होती. यासाठी प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या वतीने २७ आक्टोंबर २०२० रोजी गडचिरोली येथे जनसुनावणी घेण्यात आली. लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी लि. ने जर पर्यावरणीय परवानगी न घेताच लोह दगडाचे उत्खनन केले अशावेळी प्रदुषण नियंत्रण महामंडळाने वाढीव उत्खनन करण्यासाठी मागितलेल्या परवानगी वर जनसुनावणी घेतलीच कशी असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!