आपला जिल्हा

गडचिरोली जिल्ह्यात कोरोना वाढतीवर

१७ कोरोना बाधित तर १२ कोरोनामुक्त

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ९ ऑगस्ट

आठवडाभरापासून गडचिरोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असून जिल्ह्यात सक्रिय कोरोनाबाधीतांची संख्या ८३ झाली आहे. मंगळवारी ३९३ तपासण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १७ कोरोनाबाधित आढळून आले. तर १२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत जिल्ह्यात ७७६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७३ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०.२२ टक्के तर मृत्यू दर २.०५ टक्के झाला आहे.

कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील १, चामार्शी ४, एटापल्ली १, मुलचेरा ५ व कोरची १ जणाचा समावेश आहे. नविन बाधितामध्ये गडचिरोली ५, चामोर्शी ६, कोरची १ व कुरखेडा ५ जणाचा समावेश आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!