आपला जिल्हा

गडचिरोली जिल्ह्यात २१ कोरोना बाधित तर १३ कोरोनामुक्त

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २५ ऑगस्ट

गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी ७४० कोरोना तपासण्याचे अहवाल प्राप्त झाले. यात २१ कोरोना बाधित आढळून आले. तर १३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ७८ झाली आहे. जिल्ह्यातील आत्तापर्यंत ३८०९८ कोरोनाबाधितापैकी ३७२४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आत्तापर्यंत ७७७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७,७९ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०.१७ टक्के तर मृत्यू दर २.०४ टक्के झाला आहे.

आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील ७, भामरागड २, चामोर्शी ५, धानोरा ५, सिरोंचा १, कोरची १ जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली १, चामोर्शी १, कोरची ५ व कुरखेडा ६ जणाचा समावेश आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!