प्रियकराच्या मदतीने मुलीने केली जन्मदात्या आई ची हत्या ; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
अहेरी येथील घटना
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १९ ऑगस्ट
प्रेमात अडसर ठरणाऱ्या आईची मुलीने प्रियकराच्या मदतीने गळा आवरून हत्या केल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. निर्मला अत्राम असे मृत महिलेचे नाव आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
निर्मला यांची मुलगी उर्मिला चंद्रकांत आत्राम हिने आपला प्रियकर रुपेश येनगंधलवार याच्यासोबत मिळून ही हत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्या दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. मृत निर्मला आत्राम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणलेले आहे. पुढील कारवाई अहेरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. या घटनेने अहेरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ऊर्मिलाचे वडील चंद्रकांत अत्राम हे पोलिस विभागात नोकरीवर होते. २० वर्षांपूर्वी त्यांची नक्षल्यांनी हत्या केली होती. तेव्हापासून उर्मिलाचे पालनपोषण आईनेच केले. ऊर्मिलाला वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्याची संधी होती. परंतु, आईचीच हत्या केल्याने ऊर्मिलाला गजाआड व्हावे लागण्याची वेळ आली.