पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०६ ऑगस्ट
गडचिरोली जिल्ह्यात शनिवारी एक महिन्यानंतर कोरोनाने कुरखेडा तालुक्यातील एका ५६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तर शनिवारी ५९९ कोरोना तपासण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १५ नवीन कोरोना बाधिता आढळून आले तर ५ कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे जिल्ह्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ९० झाली आहे. तर आत्तापर्यंत ७७६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील आत्तापर्यंत ३७८४१ कोरोना बाधितांपैकी ३६९७५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७१ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०.२४ टक्के तर मृत्यू दर २.०५ टक्के झाला आहे. नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील २, अहेरी २, आरमोरी १, चामोर्शी १, धानोरा १, कोरची १ व कुरखेडा तालुक्यातील २ जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील २, धानोरा, कोरची व वडसा तालुक्यातील प्रत्येकी एक-एक जणाचा समावेश आहे.