आपला जिल्हा

चार लाखांचे सागवान लाकडू जप्त, नाल्याच्या प्रवाहातून सुरु होती तस्करी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २२ जुलै

जिल्ह्यातील सिरोंचा वनविभाग हे मौल्यवान सागवानसाठी प्रसिद्ध आहे. सध्या सिरोंचा तालुक्यात पूरपरिस्थिती आहे. तालुक्यातील विविध नदी,नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या नाल्यांच्या प्रवाहात सोडून लाकडांची रात्रीच्या अंधारात बिनबोभाटपणे वाहतूक करण्याचा फंडा सुरू झाला आहे. वनपरिक्षेत्र कार्यालय देचलीपेठाअंतर्गत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी असाच एक प्रयत्न हाणून पाडत ४ लाख रुपयांचे सागवान लाकडांचे ओंडके जप्त केले.

नियत क्षेत्र पेरकबट्टीतील मौजा कम्मासूर परिसरातील नाल्याच्या पात्रात मोठमोठे ४ ते ५ सागवान लठ्ठे एकमेकांना बांधून त्यांचा तराफा करीत ते पाण्यात सोडले होते. असे एकूण १८ नग सागवान लठ्ठे पाण्याच्या प्रवाहातून जात असताना दिसताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने हालचाली करीत ते जप्त केले. हे लठ्ठे सकाळी बैलबंडीने वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले. त्यांची एकूण किंमत ४ लाख ३१ हजार असल्याचे सांगण्यात आले. आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांचा शोध सुरु आहे.

ही कारवाई सिरोंचा येथील उपवनसंरक्षक पूनम पाटे, सहायक वनसंरक्षक एस. जी. बडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली देचलीपेठाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. बारसागडे, वनपाल एल. एम. शेख, वनरक्षक एस. टी. धनबाते, ए. आय. मट्टामी, व्ही. एन. कोरेत, एस. डी. गावडे, एल. के. गेडाम, एस. के. इनकरवार, वनमजूर एल. बी. मुलकरी यांनी केली. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी बारसागडे यांच्या मार्गदर्शनाखाली जय शेल करीत आहेत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!