आपला जिल्हा

शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात सहभागी व्हा : भाई रामदास जराते यांचे आवाहन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०१ ऑगस्ट

शेतकरी, कष्टकरी, कामगार, सर्वसामान्य नोकरदार यांच्या हक्क आणि अधिकारांसाठी राज्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून सक्रिय असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेला येत्या २ व ३ ऑगस्ट रोजी ७५ वर्ष पूर्ण होत असून गडचिरोली येथील जिल्हा कार्यालयात बुधवारी शेतकरी कामगार पक्षाचा अमृत महोत्सवी वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. या वर्धापनदिन कार्यक्रमाला शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्ते, हितचिंतक आणि कष्टकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन पक्षाच्या जिल्हा शाखेने केले आहे.

भांडवलदारांचे हित जोपासणाऱ्या काॅग्रेसने स्वतंत्र भारतात कष्टकरी, कामगार, शेतकरी, सर्वसामान्य नोकरदार यांच्या हक्कांवर गदा आणू नये यासाठी संघर्ष करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी येथे काॅग्रेसमधील केशवराव मोरे आणि शंकरराव जेथे यांच्या नेतृत्वाखाली २ व ३ ऑगस्ट १९४६ रोजी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्यात आली. पक्षाच्या स्थापनेपासून आतापर्यंत शेतकरी कामगार पक्षाने सत्तेच्या मागे न धावता विधिमंडळातील आणि रस्त्यावरच्या संघर्षातून जनहिताचे कायदे आणि धोरणं बनवायला सरकारला बाध्य केले. रोजगार हमी योजना, एकाधिकार कापूस खरेदी योजना, शेतमाल हमी भाव योजना, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षण यासारख्या कायद्याची निर्मिती ही शेकापच्या संघर्षाचे फलीत असून खऱ्या अर्थाने आजच्या राजकीय परिस्थितीत जनहिताचे कार्य करणारा वैचारिक पक्ष म्हणून तरुणांना अपेक्षित राजकीय पर्याय असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जयश्री वेळदा, युवा जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, अशोक किरंगे, दामोदर रोहणकर, रमेश चौखुंडे, प्रदिप आभारे, तुकाराम गेडाम, चंद्रकांत भोयर, सरपंच दर्शना भोपये, सरपंच सावित्री गेडाम, देवेंद्र भोयर यांनी केले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!