धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरुन देसाईगंजमध्ये काँग्रेस आक्रमक, आमदारांसह आंदोलक स्थानबद्ध
केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २५ जुलै
नीट पेपरफूट प्रकरण, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि राहुल गांधी तसेच प्रियंका गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ शुक्रवारी देसाईगंज येथे काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार रामदास मसराम यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी आपल्या वाहनातून पोलीस ठाण्यात नेऊन स्थानबद्ध केल्यानंतर हे आंदोलन थांबले.
काँग्रेसच्या वतीने आयोजित या निषेध आंदोलनाला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. रेल्वे बोगद्याजवळील टी-पॅाईंटवर आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पेपरफुट प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध, तसेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देसाईगंज शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनानंतर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना आपल्या वाहनातून देसाईगंज पोलीस ठाण्यात नेले.
आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजित कोवासे, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी सभापती परसराम टिकले, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष देसाईगंज राजेंद्र बुल्ले, काँग्रेस कमिटीचे आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कोरची मनोज अग्रवाल, मनोज ढोरे, माजी नगराध्यक्षा शालु दंडवते, धनपाल मिसार, जयमाला पेंदाम, नगरसेवक तथा गटनेता विकास प्रधान, आरती लहरी, माजी उपसभापती नितीन राऊत, नगरसेवक श्याम उईके, दिलीप घोडाम, मनोहर निमजे, सागर वाढई, ऋषि बगमारे, टोमेश्वर बगमारे, अक्षय बागडे, नंदू चावला हंसराज लांडगे, कैलास वानखेडे, आक्रोश शेंडे , परशुराम ठाकरे अमर भर्रे, साजन मेश्राम, संजय करानकर, मेघराज बुराडे, सुरेश तोडफोड,नगरसेविका आशा दहिवले, नगरसेविका पठाण, रूपलता बोदेले, वैष्णवी आकरे, होमराज हारगुडे, आनंदशिंग चावला, प्रशांत अंकमवार, भास्कर कन्नाके, व्यंकट पेंदाम, योगेश नेवारे, श्रीरसागर शेंडे, प्रमोद मेश्राम, सागर बनसोड, श्रीकांत सूर्यवंशी, अंगराज बुद्धे, डोमाजी दिवठे, लुनकरण चौधरी, कमलेश बारस्कर, जावेद कुरेशी, ताजूल उके, दुर्वास नाईक, अनिल कोठारे, संजय कोसरे, विलास बुराडे, शैलेश बगमारे, जितेंद्र चौधरी, गजानन घरत, चारुदत्त राऊत, राहुल खरकाटे, धर्मेंद्र लाडे, कुंदन बोदेले, देवानंद सहारे, पराग लांजेवार, संकेत रामटेके, निलेश दुपारे, अथर्व राणे, देवनाथ सयाम, विशाल मेंढे, योगेश ढोरे, रुपेश टिकले, शैलेश येलगधवार, साजन मेश्राम, रमेश चौधरी, विशाल मसराम, मिथुन मेश्राम, गजू नाईक, राजकुमार मेश्राम, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी आमदार रामदास मसराम यांनी, “विद्यार्थ्यांचा आवाज दाबता येणार नाही. न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील,” असे सांगितले.



