विशेष वृतान्त

गडचिरोलीत चक्का जाम आंदोलनादरम्यान जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे पोलीसांच्या ताब्यात 

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २३ जुलै 

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदी, NEET पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी आणि लोकसभा खासदार मा. प्रियंका गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ गडचिरोली येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या दरम्यान गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष एड. विश्वजीत कोवासे यांचेसह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

यावेळी बोलताना गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. कोवासे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय काँग्रेस पक्ष कदापि खपवून घेणार नाही. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने उत्तर द्यावे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य आंदोलनावर लाठीमार करणे ही लोकशाहीविरोधी बाब असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.

ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी पोलिसांचा वापर करून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न होत असला, तरी पोलिसांच्या दबावाला आम्ही कधीही घाबरणार नाही किंवा मागे हटणार नाही. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून सातत्याने संघर्ष करत राहील.

आंदोलन करताना जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे यांच्यासह इतर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक करून जबरदस्तीने उचलून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले व आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी सुद्धा घोषणा देत विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष नेहमी लढत राहील असे सुचोवात जिल्हाध्यक्ष यांनी केले.

आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी NEET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच आंदोलनादरम्यान विद्यार्थी-युवकांवर झालेल्या कथित लाठीमाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव पंकज गुड्डेवार, गटनेते तथा नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक रमेश चौधरी, माजी नगरसेवक बंडू शनिवारे, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेविका मनीषा खेवले, नगरसेविका मेगा वरगंटीवार,  समशेर खान पठाण, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे, राष्ट्रीय समन्वयक कुसुम अलाम, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज ढोरे, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, पंचायतराज सेलचे जिल्हाध्यक्ष नरेश डोंगरे, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष संजय चन्ने, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विवेक घोंगडे, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अभिजीत धाईत, NSUI चे जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, प्रदेश महिला काँग्रेसच्या पुष्पलता कुंमरे, धानोरा तालुका महिला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शेवंता हलामी, माधुरीताई मडावी,  सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष अब्दुल पंजेवाणी, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, हेमंत कोवासे, श्रीनिवास आंबटकर दिगंबर घाईत, विजय सुपारे, शालिक पत्रे, नीलकंठ गोहने,  दिगंबर बुल्ले, नंदु वाईलकर, ज्येष्ठ नेते हरबाजी मोरे, कविता उराडे, शालिनी पेंदाम, रीना गोवर्धन, चारुदत्त पोहणे, संजुभाऊ चन्ने, दिनेश सिडाम, आशिष घेर, राज घेर, गुड्डू हुलके, अनुराग निखाडे, सोनू आलाम, निकेश कामीडवार, प्रज्वल कोंडेकर, तेजस कोंडेकर, जावेद खान, मिलिंद बारसागडे, सुधीर बांबोळे, ओमप्रकाश चौधरी, आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!