आपला जिल्हाक्राईम स्टोरीताज्या घडामोडी

गडचिरोली पोलिसांकडून एका नक्षलवाद्याला अटक

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.१८ एप्रिल 

नक्षल दलम सोडून घरूनच नक्षली कारवाया करणाऱ्या २ लाख इनामी नक्षलवाद्यास गडचिरोली पोलिसांनी सापळा रचून अटक करण्यात यश मिळवले आहे. साधू उर्फ काऱ्या उर्फ संजय नरोटे वय ३१ वर्षे, राहणार झारेवाडा तालुका एटापल्ली असे अटक झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.

साधू वर २३ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यात बारा चकमकी, आठ खून, दोन जाळपोळीच्या घटना व एक दरोडा याचा समावेश आहे. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण दोन लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते. पोलिसांच्या या अटक कारवाई नंतर जानेवारी २०२२ पासून आज पर्यंत एकूण ६७ नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलीस दलाला यश आले आहे.

जिल्ह्यात उरले केवळ ९४ नक्षलवादी, त्यासाठी १२ हजार फोर्स!

गडचिरोली जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ ९४ नक्षलवादी उरले असून त्यातील ४८% नक्षलवादी हे बाहेरचे म्हणजे इतर राज्यांतील आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षलवादी अटकेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत दिली. गडचिरोली जिल्हा अजूनही नक्षलप्रभावित अतिसंवेदनशील असल्याने सी ६०, विशेष नक्षलविरोधी अभियान दल, सीआरपीएफ, एसआरपईएफ, स्थानिक पोलीस व अन्य बटालियन मिळून १२ हजारावर फोर्स तैनात करण्यात आली आहे. पोलीस विभागाकडून सामाजिक पोलिसिंगच्या माध्यमातून नागरिकांना विविध सेवा पुरविल्या जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तरुण तरुणींनी नक्षलवादाची वाट बंद केली आहे.
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!