आपला जिल्हा

जिल्ह्यात २२ कोरोनामुक्त तर १८ कोरोनाबाधित

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०८ ऑगस्ट

गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी ४०५ कोरोना तपासण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १८ कोरोना बाधिता आढळून आले तर २२ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ७८ झाली आहे. आत्तापर्यंत ७७६ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७५ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०.२१ टक्के तर मृत्यू दर २.०५ टक्के झाला आहे.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील५, चामोर्शी १, धानोरा ४, मुलचेरा ९, कोरची १, तसेच कुरखेडा २ जणाचा समावेश आहे. नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील ३, आरमोरी १, चामोर्शी ९, धानोरा २, कुरखेडा ३ जणाचा समावेश आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!