जिल्ह्यात २३ कोरोना बाधित तर १५ कोरोनामुक्त
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २९ जुलै
गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारी ५५२ कोरोना तपासण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २३ नवीन कोरोना बाधिता आढळून आले तर १५ कोरोन रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे जिल्ह्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ५८ झाली आहे. जिल्ह्यातील आत्तापर्यंत ३७७३७ कोरोना बाधितांपैकी ३६८८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकुण ७७५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७९ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०.१५ टक्के तर मृत्यू दर २.०५ टक्के झाला आहे.
नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील ५, आरमोरी १, चामोर्शी ११, कुरखेडा ३, वडसा ३ जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील६, आरमोरी तालुक्यातील १ व चामोर्शी तालुक्यातील ५ अहेरी तालुक्यातील १, धानोरा १, कुरखेडा तालुक्यातील १ जणाचा समावेश आहे.