पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २४ जुलै
गडचिरोली जिल्ह्यातील ४६५ कोरोना तपासणीचे अहवाल रविवारी प्राप्त झाले. त्यात ८ कोरोना बाधित आढळून आले तर ४ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या ५५ झाली आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत ३७६८७ कोरोनाबाधितांपैकी ३६८५७ कोरोनामुक्त झाले. तर ७७५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८० टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०.१५ टक्के तर मृत्यू दर २.०६ टक्के झाला आहे. नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील ३, चामोर्शी ०२, धानोरा ०३ जणांचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली ०२, धानोरा व कुरखेडा तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.